श्री कृष्णाची आरती
ओवाळू आरती मदनगोपाळा
ओवाळू आरती मदनगोपाळा ।
श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।।
चरणकमल ज्याचे ति सुकुमार ।
ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। ओवाळू।।1।।
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान ।
हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। ओवाळू।।2।।
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी ।
वेधले मानस हारपली दृष्टी ।। ओवाळू।।3।।
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान ।
तेणे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ओवाळू।।4।।
एका जनार्दनी देखियले रूप । पाहता जाहले अवघे तद्रूप ।ओवाळू।।5।।
shri krushnachi aarati, ovalu aarati madangopala