श्री गणपती आरती
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची
ganapati aarati , sukhkrta dukhkartaसुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठीं झळके माळ मुक्ताफळांची॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रें मनकामना पुरती ।।ध्रु।।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरे जडित मुगुट शोभतो बरा ।
रुणझुणती नुपुरें चरणी घागरिया ॥जय .॥॥०२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावें निर्वानीं रक्षावें सुरवंदना ।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥