Skip to main content
सत्यापित

प्रकल्प माहिती

।। भावपूर्ण समर्पण ।।​

श्री. नवनाथ कुलकर्णी

कै. श्री. नवनाथ कुलकर्णी

हे ॲप माझे आदरणीय वडील कै.श्री.नवनाथ कुलकर्णी यांच्या पवित्र व मंगल स्मृतीस अत्यंत आदराने व प्रेमाने समर्पित. त्यांनी दिलेला अध्यात्माचा समृद्ध वारसा पुढे नेण्याचा हा एक नम्र प्रयत्न.

श्री संग्रह​

श्री संग्रह हा मुक्त स्रोत प्रकल्प आहे. हा प्रकल्प वापरण्यासाठी आपल्याला कोणतेही शुल्क देण्याची अथवा जाहिराती पाहण्याची गरज नाही. हा प्रकल्प पूर्णपणे मोफत आहे आणि मदतीसाठी देखील कोणतेही पैसे स्वीकारले जात नाहीत.
या प्रकल्पात मराठी भाषेतील सर्व प्रकारची स्तोत्रे, आरत्या, कथा, पोथ्या व इतर साहित्य समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रकल्पाबद्दल​

  • वेबसाईट: shrisangrah.com
  • उद्दिष्ट:
    • विविध धार्मिक व सांस्कृतिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध करणे
    • कोणत्याही मर्यादेशिवाय सर्वांसाठी मुक्त उपयोग
    • समुदायाच्या योगदानाद्वारे सतत वाढ

प्रकल्पास मदत कशी कराल ?​

आम्ही प्रकल्पाच्या मदतीसाठी पैसे स्वीकारत नाही . जर आपल्याकडे कोणतीही स्तोत्रे, आरत्या, कथा किंवा इतर धर्मग्रंथ असतील, तर ते आम्हाला पाठवा:
open-source@justinclicks.com
कृपया ई-मेलमध्ये खालील माहिती द्या:

  • साहित्याचे शीर्षक
  • मूळ स्रोत किंवा लेखक
  • कोणत्याही विशेष टिप्पण्या (उदा. छायाचित्रे, ऑडिओ ट्रान्सक्रिप्ट इ.)

कोणत्याही त्रुटी किंवा सुधारणा आढळल्यास, त्या पानाचा URL आणि तपशील समविष्ट करून open-source@justinclicks.com वर ई-मेल करा.


PWA अनुप्रयोग इन्स्टॉल कसा करावा​

  1. आपल्या ब्राउझरमध्ये shrisangrah.com उघडा.
  2. अ‍ॅड्रेस बारच्या उजव्या बाजूला किंवा मेनूमधील "अ‍ॅप इन्स्टॉल करा" आयकॉन निवडा.
  3. “श्री संग्रह इन्स्टॉल करायचे?” हा संवाद दिसल्यावर इन्स्टॉल बटण दाबा.
  4. अँड्रॉइड व iOS वरील वेब-अ‍ॅपमधून ऑफलाइन वापर, मुख्यपृष्ठावरील स्वतंत्र आयकॉन आणि झटपट प्रवेश यांचा लाभ घ्या.

टीप: अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर नवीनतम अद्यतने मिळवण्यासाठी अ‍ॅप उघडल्यावर कोपऱ्यातील पुन्हा लोड करा आयकॉन निवडा किंवा पान खाली ओढून पुन्हा लोड करा.


अ‍ॅप रिफ्रेश मार्गदर्शन​

  • ऑटो रिफ्रेश: प्रत्येक नवीन प्रकाशनानंतर अ‍ॅपमधील सूचना (prompt) पाठवली जाईल.
  • मॅन्युअल रिफ्रेश:
    • मोबाईलमध्ये पान वरून खाली खेचा (pull down)
    • कंप्यूटरमध्ये ब्राउझरचा Refresh बटण क्लिक करा

धन्यवाद!​

आपल्या योगदानामुळे श्री संग्रह अधिक समृद्ध व वैशिष्ट्यपूर्ण बनेल.