जय जय राम राम कृष्ण हरी
जय जय राम जय जय राम
जय जय राम राम कृष्ण हरी ….. ||धृ||
राजाराम कृष्ण हरी
गोवर्धन हे गिरीधारी
सावळे राम कृष्ण हरी
मुकुंद मुरारी हे गिरीधारी ….. ||१||
होतो नामाचा गजर
श्री राम जय राम जय जय राम
जय राम जय राम
जय जय राम राम ….. ||२||
सुंदर ते ध्यान पहा जाऊनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || धृ ||
कर ठेवुनी कटेवरी, उभा आहे विटेवरी
कानी कुंडल मकराकार, गळा शोभे तुळशीहार
कौस्तुभ मनीविराज, कंठी दिसे शोभुनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || १ ||
विठू उभा ना बैसला, जिकडे तिकडे दाटीयेला
चराचर व्यापून सारे, विटेवर उभा राहिला
नेसला तो पितांबर दिसे शोभुनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || २ ||
सत्यानंद म्हणे विठ्ठला, डोळे भरुनी पहिले तुजला
अंतर्भाह्य तोची भरला, कुठे नाही जागा उरला
विठ्ठल दर्शनाने पंढरी, दिसे शोभुनी
भक्त जन सांभाळितो विटे उभा राहोनी || ३ ||
जय जय राम राम कृष्ण हरी jay jay ram krushna hari